24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ पेरमिली परिसरात लावलेल्या नक्षल बंदचा बॅनर स्थानिकांनी पेटवला

पेरमिली परिसरात लावलेल्या नक्षल बंदचा बॅनर स्थानिकांनी पेटवला

0
29

गडचिरोली,दि.23 : जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या पेरमिली हद्दीतील पेरिमेली ते आलापल्ली रस्त्यावरीव आरेंदा फाटा येथे नक्षलवाद्यांनी 23 मार्च ते 29 मार्च दरम्यान बंदी छोडो सप्ताह साजरा करण्याबाबत लावलेले ३ बॅनर नागरिकांनी काढून जाळले.आणि नक्षलवाद्यांचा निषेध करीत आम्ही सरकारच्या बाजूने असल्याची शक्ती दाखविली.गावकऱ्यांनी माओवाद्यांचा निषेध करत आपण माओवाद्यांच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. विकासाच्या कामात जो कुणी आडकाटी आणेल त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहू असा निर्णय ५० ते १०० गावकऱ्यांनी घेतला आहे.अनेक वर्षांपासून आपणच आदिवासी समाजातील लोकांच्या विकासासाठी झटत आहोत असे भासवून आपलाच फायदा पाहणाºया आणि गरीब आदिवासी जनतेच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीत आडकाठी बनून विकासास बाधक ठरणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधात आरेंदातील गावकºयांनी एल्गार पुकारला आहे. आठवडाभरापूर्वी भामरागड उपविभाग हद्दीतील ४ गावांतील गावकºयांनी एकत्र येत अशाच प्रकारे निषेध नोंदवत नक्षलींनी बांधलेले स्मारक उद्ध्वस्त केले होते.