23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ जिल्हास्तरीय महिला मेळावा शनिवारला जिनियस रिसोर्ट येथे

जिल्हास्तरीय महिला मेळावा शनिवारला जिनियस रिसोर्ट येथे

0
28

गोंदिया,दि.२३ः- जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय भव्य महिला मेळाव्याचे आयोजन उद्या शनिवारला सकाळी ११ वाजता बालाघाट मार्गावरील जिनियस रिसोर्ट नागरा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व महिला लोकप्रतिनिधी,सरपंच,सदस्य,जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यांसह महिला बचतगटाच्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे यांनी केले आहे.आयोजनासाठी महिलाबालकल्याण विभागाचे अधिकारी,गोंदियाचे गटविकास अधिकारी झेड.डी.टेंभरे यांच्यासह एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
या महिला मेळाव्याचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रफुल पटेल,खासदार अशोक नेते,आमदार परिणय फुके,आमदार गोपालदास अग्रवाल,विजय रहागंडाले,संजय पुराम,जि.प.उपाध्यक्ष हामिद अल्ताफ अली,महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे,शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने,गोंदिया प.स.सभापती माधुरी हरिणखेडे,उपसभापती चमनलाल बिसेन,नागरा सरपंच पुष्पाबाई अटराहे,उपसरंपच अमृतलाल पतेहे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य,महिला बालकल्याण समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.