मांडोदेवी येथे सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा उद्या

0
19
– ४१ हून अधिक जोडपे होणार विवाहबद्ध
गोरेगाव,दि.24 : विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ सुर्यादेव मांडोदेवी येथे दरवर्षी  चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा चैत्राच्या पहिल्या दिवशी ११५१ ज्योती कलश  प्रज्वलीत करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे २५ मार्च रोजी सायंकाळी सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ४१ जोडप्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे जवळपास ५० हून अधिक जोडपे विवाह बद्ध होणार आहेत. अशी माहिती सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीचे सचिव विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.  विशेष म्हणजे सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा  जिल्ह्यात सर्वप्रथम देवस्थान समितीने सुरू केली आहे. या वर्षीचे  ३९ वा सोहळा आयोजित होणार आहे.
विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ सुर्यादेव मांडोदेवी भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज हजारोच्या संख्येत भाविक हजेरी लावत असतात. त्यातच चैत्रनवरात्र उत्सव दरम्यान तिर्थस्थळाला यात्रेचे स्वरुप येत असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून ११५१ ज्योती कलस स्थापना करण्यात आली आहे. दर दिवस पुजा अर्चनासह विविध  धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. २५ मार्च रोजी सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा आयोजित आहे. या सोहळ्यात सर्वधर्माचे ४१ जोडप्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे ५० हून अधिक जोडपे विवाह बद्ध होतील असा अंदाज समितीच्या पदाधिकार्‍यांनी वर्तविला आहे. याप्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.