25.4 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home Top News राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवपायलीजवळ बिबटयाच्या मृत्यू

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवपायलीजवळ बिबटयाच्या मृत्यू

0
42

सडक अर्जुनी(बबलू मारवाडे)दि.24ः- गोंदिया जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव/देवपायली गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाला लागून वन्यजीव व वनविभागाचा घनदाट जंगल आहे.या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर असून त्यामुळेच डोंगरगावपासून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही थांबले आहे.त्यातच आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाच्या धड़केत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.माहिती मिळताच वन व वन्यजिव विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.