23.5 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home विदर्भ नक्षल्यांनी केली आत्मसमर्पित नक्षल्याची हत्या

नक्षल्यांनी केली आत्मसमर्पित नक्षल्याची हत्या

0
28

धानोरा,दि.२५ : – नक्षल्यांनी पाच वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्याची  गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दराचीपासून काही अंतरावर असलेल्या सिंदेसूर मार्गावर काल २३ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. तलवारशहा बाबुराव मडावी (२५) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार कोरची तालुक्यातील नाडेकल येथील मुळ रहिवासी तलवारशहा मडावी याने पाच वर्षापूर्वी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर तो धानोरा तालुक्यातील दराची येथे दोन वर्षापासून वास्तव्य करीत होता. काल रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास दराची येथे तलवारशहा मडावी याच्या घरी १२ ते १५ च्या संख्येत नक्षली दुचाकीने आले. त्यांनी तलवारशहाला घरून नेले. दराचीपासून ५०० मीटर अंतरावर सिंदेसूर मार्गावर नक्षल्यांनी तलवारशहाच्या डोक्यावर, मानेवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. नक्षल्यांनी मृतकाच्या खिशात पोलिस खबºया असल्याचा उल्लेख केलेली चिठ्ठी टाकून ठेवली. अधिक तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.