राष्ट्रवादीला सक्रिय कार्यकर्त्यांची गरज

0
7

लाखांदूर दि.२५ : कोणताही पक्ष हा नेत्यामुळे चालत नाही तर कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य दुवा असतो. नुसते कागदोपत्री पक्ष सदस्यांची नोंदणी न करता तनमनाने इच्छुक असणाऱ्यांना पक्षाशी जोडून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्रिय कार्यकर्त्यांची गरज असून प्रत्येक कार्यकर्ता हा क्रियाशील असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लाखांदूर येथे शनिवारला आयोजित साकोली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल बावनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, धनंजय दलाल, डॉ.विकास गभने, बालु चुन्ने, लता परसगडे, विजय शिवनकर, रेखा ठाकरे, कांता मेश्राम, कल्पना जाधव, कल्याणी भुरे, तोमेश्वर पंचभाई, उर्मिला आगासे, अंगराज समरीत उपस्थित होते.
यावेळी खा.पटेल म्हणाले, मागील काळात या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. येथील शेतकरी व शेतमजुरांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मात्र मागे वळून पाहिले असता एकटाच होतो. अशी वेळ पुन्हा यायला नको. आता प्रत्येक कार्यकर्त्यांने पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले पाहिजे. ज्यांना पक्षात काम करायचे नसेल त्यांनी आताच सांगा, कुणावरही कुठलिही जबरदस्ती नाही, असा दमही दिला.
दरम्यान धनराज हटवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले. आभारप्रदर्शन शिलमंजु सिंव्हगडे यांनी केले. कार्यक्रमासाठी देवानंद नागदेवे, विनोद ढोरे, दीपक चिमनकर, वैशाली हटवार, दिनेश कुडेगावे, धनराज ढोरे, देविदास राऊत, दुर्गेश कांबळे, प्रियंक बोरकर, अ‍ॅड. मोहन राऊत, प्रशांत हटवार, जितु सुखदेवे, चंद्रशेखर खेडीकर, नरेश दिवटे यांनी सहकार्य केले.