24.5 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home Top News चकमकीत एक नक्षलवादी ठार

चकमकीत एक नक्षलवादी ठार

0
38

गडचिरोली, दि.२५: एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील आज दुपारी अलेंगा येथील जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली असून, नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.प्राथमिक माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील कोटमी नजीकच्या अलेंगा जंगलात सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका नक्षलीचा मृतदेह आढळून आला. तिच्याकडील बंदूक व काही स्फोटकेही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.