23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home महाराष्ट्र ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे दीर्घ आजाराने निधन

ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे दीर्घ आजाराने निधन

0
22

औरंगाबाद,दि.27-पहिल्‍या मराठी विश्‍व साहित्‍य संमेलनांचे अध्‍यक्ष व ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. शहरातील एमआयटी हॉस्पिटल येथे त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. साहित्‍यातील योगदानाबद्दल त्‍यांना पद्मश्री पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या निधनाने साहित्‍य विश्‍वात हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.