41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय घुघ्घुसमध्ये भाजपचा पराभव,अपक्ष रंजिता आगदारी विजयी

घुघ्घुसमध्ये भाजपचा पराभव,अपक्ष रंजिता आगदारी विजयी

0
30

चंद्रपूर,दि.07ः- चंद्रपुर पंचायत समितीच्या घुघ्घुस गणासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला हादरा बसला आहे. घुग्घुस हे राज्याचे अर्थमंञी सुधीर मुनगंटीवारांचे कट्टर समर्थक असलेले चंद्रपुर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेंचे मुळ गाव आहे.येथील पंचायत समिती पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार रंजिता आगदारी या विजयी झाल्या आहेत. यापुर्वी ही जागा भाजपकडे होती येथे भाजपच्या पंचायत समिती सदस्य असलेल्या शालु शिंदे यांनी आत्महत्या केल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत भाजप तिस-या क्रमांकावर गेली. ही निवडणुक जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रतिष्ठेची केली होती.माञ काॅंग्रेसला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

blank