कटंगी गावाला अदाणी फाऊडेशनने दिल्या सिमेंट खुर्च्या

0
15

गोरेगाव,दि.7:- तालुक्यातील कटंगी बुजरुक च्या विकास कामाला गती यावी म्हणुन सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्तीने अदानी फाऊडेशन कडे सिमेंट खुर्च्या, जि प शाळेच्या विद्यार्थ्यासाठी खेळणी, बालउद्यान झुले या साहीत्याची मागणी केली होती.त्या मागणीचा सकारात्मक विचार करीत अदानी फाऊडेशनने कटंगी बुजरुक ग्रामंपचायतीला सिमेंट खुर्च्या आवश्यक जागी बसवुन दिल्या.यावेळी सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, पोलीस पाटील हेतराम हरिणखेडे, नोजेंद्र भगत, रुपेद्र दिहारी, ईश्वरदास टेभुर्णीकर, कादीर अगवान, बेनीराम चौरागडे, श्रीराम भगत, अनंतराम राउत, नानेश्वर हरिणखेडे, रोशन कटरे, दिगंबर चौरागडे, नान्हु फुलबांधे, मुलचंद रहांगडाले उपस्थित होते.