
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे qढडवडे निघाले
गोंदिया,दि.१०ः-अहमदनगर मध्ये दोन शिवसैनिकांची इतर राजकीय पक्षाकडूनच झालेली हत्या ही राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचेच प्रतिक असून राष्ट्रवादी काँगेस,भाजप व काँग्रेसने एकत्र येऊन केलेल्या या हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यात येत आहे.याप्रकरणातील आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याला फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
अहमदनगर येथिल पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन शिवसेनेला शह दिला. काल झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येमागे याच पक्षाचा हात असून, राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याचे शिवहरे यांनी म्हटले आहे.केडगाव येथे शनिवारला शिवसेनेच्या संजय कोतकर, आणि वसंत ठुबे या दोन पदाधिकाèयांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेध गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने नोंदविण्यात आला आहे.याप्रकरणात दिरगांई करणाèया पोलीसावर सुध्दा कारवाईची मागणी करण्यात आली आहे‘ज्याने हत्या केली त्याचा फोटो मी पाहिला असून तो केडगाव पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन नाचतोय. तोच आरोपी आमदारांबरोबर बूथवरही होता.त्यामुळे संघटित गुन्हेगारीतून हा हल्ला झाल्याचे शिवहरे यांनी म्हटले आहे.याप्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे.भविष्यात कायदा व सुव्यवस्था राखली गेली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने काम करेल, असा इशाराही प्रसिध्दीपत्रकातून मुकेश शिवहरे यांनी दिला आहे.





