40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News जिल्ह्यातील १०५ आदिवासी जोडपे रविवारला होणार विवाहबद्ध 

जिल्ह्यातील १०५ आदिवासी जोडपे रविवारला होणार विवाहबद्ध 

0
48

blank

पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम

गडचिरोली दि.२८ः: पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली व मैत्री परिवार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार, २९ एप्रिल रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनमध्ये सकाळी १० वाजता भव्य सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूरचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी सीआरपीएफ (अभियान) चे पोलिस उपमहानिरीक्षक टी. शेखर राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंग उपस्थित राहील. या सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील १०५ आदिवासी जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व मैत्री परिवार संस्था नागपूर यांनी केले आहे.

blank