रखरखत्या उन्हात सौंदड रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे बेहाल

0
8

सडक अर्जुनी दि.२८ः: गोंदिया जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सौंदड हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव तसेच गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर महत्वाचे स्थानक आहे.या रेल्वेस्थानकावरूनच भंडारा जिल्ह्यातील साकोली व गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी,देवरी परिसरातील प्रवाशी ये जा करतात.मात्र त्या प्रवाशांसाठी ज्या सोयीसुविधा या रेल्वेस्थानकात रेल्वेप्रशासनाने करायल्या हव्या त्या नसल्याने प्रवाशांना कडक उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे.त्यातच बसण्याची सुविधा सुध्दा या स्थानकावर पुरेशा प्रमाणात नसल्याचे चित्र बघावयास मिळते. परिसरातील 30-40 किलोमीटर अंतरावरील नागरीकांसाठी हे महत्वाचे स्थानक असताना आणि अनेकदा सौंदडवासियांनी रेल्वे प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून येथील समस्या सोडविण्याच मागणी केल्यानंतरही त्या कायम आहेत.त्यातच सध्याचे दिवस कडक उष्णतेचे असून तापमान 44 अंश सेल्सियवर पोचलेले असताना शेड अभावी प्रवाशांना रेल्वेगाडीची वाट बघत उभे राहण्याची वेळ आली आहे.तर बसण्यासाठी ज्या खुर्च्या आहेत त्या सुध्दा मोडकळीस आल्याने प्रवाशांना बसायलाही जागा राहिलेली नाही.या सर्व समस्याकडे रेल्वेप्रवाशांने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेने केली आहे.