शोधमोहिमेत मिळाला एका नक्षल्याचा मृतदेह

0
4

गडचिरोली, दि.२८ः::  जिल्हातील भामरागड तालुक्यातंर्गत येत असलेल्या ताडगाव (कसनसूर) परिसरात गेल्या पाच सहा दिवसापुर्वी झालेल्या पोलीस नक्षल चकमकीतील मृत नक्षल्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शोधमोहिमेंतर्गत आज २८ एप्रिल रोजी पुनच्छ: एक नक्षलांचा मृतदेह इंद्रायणी नदीकाठी कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. यामुळे आता या चकमकीतील मृत नक्षल्यांची संख्या ३४ झाली तर राजाराम खांदला परिसरात झालेल्या चकमकीत ६ नक्षल ठार झाले होते असे ४० नक्षल्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तसेच पोलीस पथकाद्वारे शोध मोहीम अद्यापही सुरुच ठेवण्यात आल्याची माहिती गडचिरोली पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.