33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ शांतनू गोयल यांची बदली, विजय राठोड गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

शांतनू गोयल यांची बदली, विजय राठोड गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

0
60

गडचिरोली,दि.२: राज्य सरकारने आज २७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण करण्यात आले असून, विजय राठोड हे गडचिरोलीला सीईओ म्हणून येणार आहेत.शांतनू गोयल यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर येणारे विजय राठोड हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या श्री.राठोड हे अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शांतनू गोयल यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारला. विकास कामे सुरु असलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन काम बघणारा अधिकारी म्हणून श्री.गोयल यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

blank