24.4 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ सुषमाताई अंधारेवरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

सुषमाताई अंधारेवरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

0
37

वाशीम दि.०३:- बहुजन ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करणार्या प्रा. सुषमाताई अंधारे यांच्यावर मध्यप्रदेशातील इंदोर येथून व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परत येत असताना अनोळखी नंबर नसलेल्या गाडीने मागून जबरदस्त धडक दिली. त्यामध्ये सुषमा ताई अंधारे जखमी झाल्या आहेत
सदर धडक देणार्यां वाहनचालकावरर कठोर कारवाई करावी. व तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.सुषमाताई अंधारे यांना शासनाने त्वरीत पोलीस संरक्षण द्यावे. यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने दिनांक  4 एप्रिल 2018 रोजी दुपारी 3 :30 वाजता सर्व आंबेडकरी चळवळीतील व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी बस स्थानक जवळील रेस्ट हाऊस येथे आयोजित निषेध सभेला उपस्थित राहावे असे आवाहन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान व प्रविण पट्टेबहादूर यांनी केले आहे.