26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home महाराष्ट्र भिडेंना अटक करा, अन्यथा अधिवेशनात विधानभवनाला घेराव

भिडेंना अटक करा, अन्यथा अधिवेशनात विधानभवनाला घेराव

0
27

मुंबई,दि.04– कोरेगाव भीमा हिंसाचारातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. मिलिंद एकबाेटे अाणि भिडे यांना सरकार अाणि मुख्यमंत्री जाणीवपूर्वक पाठीशी घालत अाहेत. त्यांना वाचवण्यासाठी भाजपने तथाकथित सत्यशाेधन समिती तयार केली अाहे. ही समिती मुख्य अाराेपीवरून लक्ष विचलित करून दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले, भिडेंची शिवप्रतिष्ठान ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना आहे. ते मनुवादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावण्याचे काम करत अाहेत. कारेगाव भीमा उद्रेकाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवण्याची याेजना हाेती. मात्र, संभाजी ब्रिगेड अाणि परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन हे थांबवले. परंतु तरी त्यांची याेजना अाहे. त्यामुळे भिडेंना अटक करून त्यांची चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली.