आर्थिक आरक्षण मागणारे संविधानद्रोही आहेत-विलास काळे

0
14
संविधानिक न्याय यात्रेचे गोंदियात स्वागत
गोंदिया,दि.०4 :या देशाचा मुळनिवासी असलेला अठरापगड जातीतील ओबीसी समाज आजही आपल्या संविधानिक अधिकारापासून वंचित आहे.या समाजाला सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात पाहिजे ते प्रतिनिधित्व न देता उलट आर्थिकतेच्या आधारावर आरक्षणाची मागणी करून ओबीसी समाजाला भटकविण्याचे षडयंत्र देशात राबविले जात आहे.वास्तविक आर्थिक आरक्षणाला कुठलाच आधार नसून घटनेतही त्याबद्दल कुठेच उल्लेख नसल्याने सामाजिक आरक्षणाचा विरोध करण्यासाठी आर्थिक आरक्षणाची मागणी करणारेच संविधानद्रोही असल्याचे प्रतिपादन विलास काळे यांनी व्यक्त केले.
ते गोंदिया येथील शास्त्री वॉर्डात आयोजित संविधानिक न्याय यात्रेनिमित्त आयोजित सभेत शनिवारला बोलत होते.यावेळी विचारमंचावर सqवधानिक न्याय यात्रेचे संयोजक डॉ.ज्ञानेश्वर गोरे,प्रा.रमेश पिसे,सुनीता काळे,माया गोरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,युवा बहुजन एकता मंचचे अध्यक्ष सुनील भोंगाडे,राजेश कापसे उपस्थित होते.
पुढे बोलताना काळे म्हणाले की, ओबीसीच्या विकासासाठी ओबीसालाच पुढे यावे लागणार आहे.माझ्याकडे कार्यक्रम आहे,लग्न आहे,तेरवीचे जेवण आहे असे कारण पुढे करून आत्ता चालणार नाही.ओबीसींची शक्ती तयार करतानाच आदिवासी व दलित बांधवांना सोबत घेतले पाहिजे.१९३१ पासून आम्हा ओबीसींच जनगणना का केली जात नाही याचा विचार केल्यास आमच्या हक्काच्या जागेवर जे उच्चवर्णीय बसले आहेत,त्यांना आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांनी बळकावलेल्या जागा रिकाम्या होतील.यासाठीच आम्हा ओबीसींची जनगणना करण्यास विरोध केला जाते,जेव्हा या देशात राज्यात किती उंदीर मेले वाचले याची मोजणी केली जाते.पशुपक्ष्यांची जनगणना होते परंतु आपली होत नाही कारण आपण आपली शक्ती दाखविण्यात कुठे तरी कमी पडत आहोत.त्यामुळे संघटन शक्ती तयार करण्यासाठी जातीच्या संघटनेत नव्हे तर ओबीसी प्रवर्गाची संघटना बळकट करा असे आवाहन केले.सोबतच सqवधान हे कुठल्या एका जातीला प्रतिनिधित्व देत नाही तर ते प्रर्वगाला प्रतिनिधित्व देते याकडेही लक्ष ठेवा असे आवाहन केले.एकमेकांच्या जातीबद्दल दुराग्रह न ठेवता एकत्र येत मेंदूतील जातीयतेचे कीड काढून ओबीसी प्रवर्गासाठी जो पुढे येऊन काम करतो त्याच्या खांद्याला खांदा लावून संघटित व्हा असे विचार व्यक्त केले.
यात्रेचे संयोजक डॉ. ज्ञानेश्वर गोरे म्हणाले की,देशाचा प्रधानमंत्री व राज्याचा मुख्यमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो तर तो देशाचा असतो.ओबीसींना जातीजातीमध्ये विभागून एकमेकांना श्रेष्ठ सांगत संघटित होण्यापासून रोखण्याचे काम उच्चवर्णीयांनी केल्यानेच आमचा ओबीसी संघटित होऊ शकला नाही.मात्र दक्षिणेतील ओबीसी हा एकसंध राहिल्यानेच त्याठिकाणी आज ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत आहे.तेव्हा दक्षिणेतील ओबीसींच्या एकतेची प्रेरणा मनात घेऊन मानवी हक्कासाठी ही संघर्षाची लढाई असून यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.गोरे म्हणाले की आजही आमचा ओबीसी शिक्षणात पुढे आलेला नाही.सामाजिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात खूप मागासला आहे.देशामध्ये आमच्या ओबीसी नेत्याविरुद्ध वाईटवातावरण तयार करून त्यांनाच दोषी ठरविण्याचा एकसूत्री कार्यक्रम सुरू झाला आहे.त्यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी असलेली पद्धती बदलून युपीएससीप्रमाणे परीक्षा पद्धतीची गरज निर्माण झाली आहे.ओबीसी हक्कासाठी विकासासाठी विविध आयोग गठित झाले,मात्र त्या आयोगाच्या शिफारशींना संसदेत ठेवले गेले नसल्याने त्या आयोगांनी सुचविलेल्या उपाययोजना पासून समाज वंचित राहिला आहे. प्रा.रमेश पिसे यांनी ओबीसी विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.राहायला वसतिगृह नाही यावर विचार व्यक्त केले.यावेळी माया गोरे व सुनीता काळे यांनीही विचार व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात बबलू कटरे यांनी या देशातील ओबीसी हा स्वतःला जोपर्यंत मागास समजणार नाही आणि आपल्यातील उच्चभूपणाची भूमिका सोडणार नाही,तोपर्यंत संघटनशक्ती होणार नाही.आम्ही संघटनेच्या माध्यमातून सातत्याने ओबीसंीना जागृत करण्याचे कार्य करीत आहोत ते असेच सुरू राहणार आहे.परंतु इतर कार्यक्रमांना आपण जसे प्राधान्य देत दिवसभर उपस्थित राहतो,त्याचप्रमाणे आपण ओबीसी आहोत हे मनात पक्के करून ओबीसीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.संचालन सावन कटरे यांनी तर आभार सावन डोये यांनी मानले.आयोजनासाठी कैलास भेलावे,खेमेंद्र कटरे,संतोष खोब्रागडे,रवी भांडारकर,संतोष वैद्य,प्रेमलाल साठवणे,डॉ.सजीव रहांगडाले,सविता बेदरकर,एस.यु.वंजारी,एच.एस.बिसेन,शिशिर कटरे,जीवन रहागंडाले आदींनी सहकार्य केले.