24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ नामनिर्देशनाच्या पाचव्या दिवशी १९ पक्षांनी घेतले ३३अर्ज

नामनिर्देशनाच्या पाचव्या दिवशी १९ पक्षांनी घेतले ३३अर्ज

0
17

भंडारा, दि. ८ : भंडारा ह्न गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीच्या पाचव्या दिवशी २ उमेदवारांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात विरेंद्र कुमार जायस्वाल भाजपा व अपक्ष म्हणून तर सुहास अनिल फुंडे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आज १९ पक्षांनी ३३ नामनिर्देशन पत्राची उचल केली आहे. नामनिदेशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख १० मे, २०१८ पर्यंत आहे.
यामध्ये देवराव बावणकर शिवसेना/अपक्ष-३, ऋषीपाल टेंभरे अपक्ष-१, दिगांबर मते अपक्ष-१, डॉ. राजेश नंदुरकर बहुजन समाज पॅनल-१, रेखलाल टेंभरे भाजप-२, संजय बारेवार भाजप-२, रमेश हजारे अपक्ष-१, रोहिदास राऊत भारिप बहजन महासंघ-१, खुशाल बोपचे भाजप-१, संजय मगर बहुजन रिप सोसा. पार्टी-३, विनोद नंदुरकर भारीप बहुजन महासंघ/अपक्ष-२, बाबु डोंगरे भारीप बहुजन महासंघ/अपक्ष-२,देवराव बोरकर भारीप बहुजन महासंघ-२, धर्मराज भलावी बहुजन मुक्ती पार्टी-२, राजकुमार भेलावे पीपल्स रिपब्लीकन पार्टी-४, पंकज फुलसुंगे अपक्ष-१, नितीन धकाते आदीम कृती समिती-१, नितिन दुरुगकर भाजपा-१, जयकुमार रावलानी शिवसेना-२ यांचा समावेश आहे.