43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांची कॅन्सरला कंटाळून आत्महत्या

अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांची कॅन्सरला कंटाळून आत्महत्या

0
15

blank

मुंबई,दि.11 – राज्याचे पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांनी कॅन्सरला कंटाळून आत्महत्या केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कॅन्सरने त्रस्त होते. रॉय यांनी स्वतःच्या बंदुकीनेच दुपारी पाऊने दोनच्या सुमारास गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. रॉय यांना कॅन्सर झाल्याचे समोर आल्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांनी अमेरिकते जाऊन कॅन्सरवर उपचारही घेतले होते. मात्र तरीही या आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.हिमांशू रॉय हे गेल्या काही काळापासून कॅन्सरने त्रस्त होते. या आजारामुळे वेदनांनी त्यांना प्रचंड त्रास होत होता, असे त्यांच्या बरोबर असलेले सहकारी सांगत असत. त्यांना भेटायला गेले असता त्यांना वेदना पाहणेही शक्य होत नसल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. या वेदनांना कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टेरॉइड्सचे सेवन केल्यामुळे त्यांच्या शरिरावर त्याचा परिणाम झाला होता, अशीही चर्चा आहे.

blank