
गोंदिया,दि.०७- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागताच कर्मचाèयांच्या बदली प्रकियेला सुरवात करण्यात आली.या बदलीप्रकियेला काहींनी पारदर्शक म्हटले असले तरी काही बदल्यांमध्ये नियमबाह्य बदल्या करण्यात आल्याचा सुर पुढे येऊ लागला आहे.विविध कर्मचारी,अधिकारी संघटनेचे जे पदाधिकारी अध्यक्ष,सचिव असतात त्यांना जिल्हा मुख्यालयी ठेवण्यासंबधी सुट देण्यात आलेली आहे.परंतु यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नियमाला बगल देत बदल्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.तर बांधकाम विभागातील एका महिला कर्मचारीला कालावधीपुर्वीच बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे.सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या बदल्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक सौरभ अग्रवाल यांची बदली ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग देवरी येथे करण्यात आली आहे.जेव्हा की हे त्या संवर्गाच्या कर्मचारी संघटनेचे नेते आहेत.त्यांनी यासंबधी माहितीही दिली परंतु त्यांची कुणीही एैकले नाही.बदलीनंतरही अग्रवाल यांनी आपण तिथे काम करण्यास तयार नसून अध्यक्षाकडे मला प्रतिनियुक्तीवर परत आणा असा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे.वरिष्ठ सहाय्यक श्याम लिचडे यांची बांधकाम विभागातून पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे,कृषी अधिकारी विलास निमजे यांची कृषी विभागातून पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे,शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी जी.एस.पवार यांची सालेकसा पंचायत समितीत कक्ष अधिकारी म्हणून तर शिक्षण विभागाच्या अधिक्षिका श्रीमती वंजारी यांचीही बदली सालेकसा पंचायत समितीला करण्यात आली आहे.गोरेगाव पंचायत समितीचे अधिक्षक पी.जी.शहारे यांची गोंदिया जिल्हा परिषद कृषी विभागात अधिक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.सडक अर्जुनी पंचायत समितीचे अधिक्षक जनबंधू यांची शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे.कृषी विभागाच्या कनिष्ठ सहाय्यक तेजस्विनी चेटुले यांची सालेकसा पंचायत समिती येथे,सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ सहाय्यक लेखा पडस्कर यांची आमगाव पंचायत समितीमध्ये बदली करण्यात आली आहे.