25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धानबियाणावर 100 रुपयांची सुट

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त धानबियाणावर 100 रुपयांची सुट

0
28

गोंदिया दि.१४ः:: शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांना बियाणांच्या प्रत्येक बोरीवर 100 रुपयाची सुट जाहिर केली अाहे.त्या योजनेचा शुभारंभ गोंदिया येथील कृषी केंद्रात करण्यात आला.जी किमंत असेल त्यापेक्षा 100 रुपये सदर दुकानदाराला कमी द्यायचे असून ते 100 रुपये शिवसेनेच्यावतीने सदर कृषी केंद्रसंचालकाला देण्यात येणार आहे.13 जून रोजी या योजनेचा शुभारंभ सायकांळी करण्यात आला. सध्या शेतकऱ्यांना एका सातबाऱ्यावर बियाण्यांची एक बॅग मिळत आहे. त्यामुळे पेरणीच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना जेवढ्या बियाण्यांची गरज आहे  तेवढे बियाणे उपलब्ध करुन देण्यासंबधी प्रयत्न करणार असल्याचे मुकेश शिवहरे यांनी म्हटले आहे.यावेळी जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,उपजिलाप्रमुख तेजराम मोरघडे, सोहन क्षीरसागर, सुनील लांजेवार, प्रमोद सोनवाने, मनिष गौतम, बापी लांजेवार, तालुका प्रमुख अमरसिंग, शहरप्रमुख संजू शमसेरे, हर्षल पवार, आशु मक्कड़, आशु महाराज सहित अनेकों पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे।आदी उपस्थित होते.