35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News 15 जुलैपासून चंद्रपूर वीज केंद्र बंद

15 जुलैपासून चंद्रपूर वीज केंद्र बंद

0
35

blank

चंद्रपूर दि.30:: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.

blank