देवरी ग्रामीण रुग्णालयाचा होणार कायापालट!

0
21

देवरी,दि.0१ःः-येथील ग्रामीण रुग्णालयालाच्या इमारतीची समस्या आता सुटणार असून लवकरच या ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाबरोबरच तालुक्यातील पालांदूर / जमीदार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही अच्छे दिन येणार असून दोन्ही रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून साडे अठरा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवाचा लाभ घेता यावा यासाठी राज्यातील प्रत्येक मोठया गावात ग्रामीण रुग्णालय व प्राथमीक आरोग्य केंद्र सुरू केले. या अनुषंगाने देवरी येथे ४ जून १९८२ रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने सदर ईमारतीची जिर्णावस्था झाली. परिणामी येथे उपचारार्थ दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन रुग्णालयात वावरत आहेत. त्यामुळे याठिकाणी कधीही धोका निर्माण होण्याची भीती आहे. इमारतीच्या बांधकामाला जास्त दिवस झाल्यामुळे रुग्णालयाची इमारत र्जजर झाली असल्याने याठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता लागली आहे. त्यातच तालुक्यातील पालांदुर(जमी) येथे प्राथमीक आरोग्य केंद्राची ईमारतच नसल्याने या ठिकाणीही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे येथील रुग्णांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
देवरी तालुका हा अतिदुर्गम, संवेदनशिल नक्षलग्रस्त तालुका असून राष्ट्रीय महामार्ग क्र .६ वर देवरी शहर आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्ग असल्याने या ठिकाणी नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात. तर अनेक रुग्ण याठिकाणी आपला उपचार करून घेतात. मात्र सदर ईमारत जीर्ण झाली असल्याने ती कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
दरम्यान, काही सुज्ञ नागरिकांनी आ. संजय पुराम यांच्याकडे या विषयाला घेवून इमारतीच्या सुधारणेसंबंधी मागणी केली असता आ. पुराम यांनी शासनाकडे या विषयाला घेऊन सतत पाठपुरावा केला. तेव्हा त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी साडे बारा कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे.