34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता दुचाकीला अपघात १ जागीच ठार २ जखमी

दुचाकीला अपघात १ जागीच ठार २ जखमी

0
32

blank

अहेरी,(अशोक दुर्गम)दि.02 :-नागेपल्ली येथील श्री महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ उभा असलेल्या दुचाकीला भरघाव वेगाने येणार्या  दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.तर  २ व्यक्ती जखमी झाल्याची घटना आज घडली.जखमीवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवित तपास सुरु केला आहे. सविस्तर असे की, नागेपल्ली येथील श्री महालक्ष्मी पेट्रोलपंपा जवळ थांबून असलेली गाडी क्र. MH 33 H 0538 या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान  जबर धडक दिल्याने प्रभाकर व्येंका आलाम वय ५२ रा. टेकूलगुडा यांचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य दोनजण जखमी आहे. जखमी मध्ये कपिल बंडूजी तलाडे वय २२ रा टेकूलगुडा, शंकर भगवान आत्राम वय २० रा. मिट्टीगुडम आणि अन्य दोन जणांना किरकोळ मार लागल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बाळासाहेब शिंदे. पिएसाय विनायक दडलपाटील यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली.या अपघातात दुचाकीच्या समोरचा भागाचे नुकसान झाले आहे.

blank