शेतक-यांनी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा

0
80
मोहाडी,(नितिन लिल्हारे),दि.02ः-  शेतक-यांना स्वतःच्या हक्काचे कृषि यंत्रसामुग्री अवजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उन्नत शेती – समृद्ध शेतकरी मोहिमअंतर्गत सालई खुर्द येथे वीरांगना शेतकरी बचत गट यांची श्री पद्धत सुधारित भात पीक प्रात्यक्षिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कृषीसहाय्यक पि.आर.भोयर कृषीविभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती व शेतकर्यांना डीबीटीद्वारे बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळणार असल्याची माहिती दिली.
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान शेती हा आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्‍यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्‍पन्न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याचे शासनाचे ध्‍येय आहे. या ध्‍येयपूर्तीसाठी राज्‍य शासनाने ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ हे महत्‍त्‍वाकांक्षी अभियान सुरु केले आहे.
उन्नत शेती – समृद्ध शेतकरी” मोहीम प्रमुख उद्देश प्राप्त होणारी उत्पादकता व या पिकांच्या अनुिवांशिक उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणे, आनी पीक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे व पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना संरक्षित करणे” तसेच शेतक-यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे उपलब्ध असलेली अवजारे या अभियानात देण्यात येत आहे. अभियानांतर्गत ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्र, लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कल्टीव्हेटर, रिपर व रिपर कम बार्इंडर, मळणीयंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसॉइलर  इत्यादी अवजारे अनुदानावर मिळतात. राज्यातील बळीराजा संपन्न, समृद्ध व स्वयंपूर्ण व्हावा यासाठी तसेच शेतीचे उत्पादन वाढून त्‍यांची आर्थिक उन्‍नती व्‍हावी, यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजना राबवत असतो. विविध निविष्‍ठा, औजारे आणि सूक्ष्‍म सिंचन संच तसेच अन्‍य पायाभूत सुविधांचे अनुदान शेतकऱ्यांच्‍या आधार संलग्‍न बँक खात्‍यावर जमा करण्यावर भर देण्‍यात आला आहे.
शेतीचे उत्‍पन्‍न वाढविण्‍यासाठी कमीत कमी उत्‍पादन खर्च कसा राहिल, याचाही विचार करण्‍यात आला. दर्जेदार जैविक खते, किटकनाशके यांचा वापर करुन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचे उत्‍पन्‍न वाढविण्‍याबाबत वीरांगना शेतकरी बचत गटाला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्‍यात आले. उन्नत शेती – समृद्ध शेतकरी” चा लाभ घ्यावा व  शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करावी, यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पि.आर.भोयर यांनी केले. यावेळी ए. सार्वे कृषी पर्यवेक्षक, तलाठी कटरे, गटाचे अधक्ष ईश्वर लिल्हारे, सचिव नितीन लिल्हारे, उपाध्यक्ष शैलेश लिल्हारे,प्रवीण लिल्हारे, घनश्याम अठराहे, ईश्वर दमाहे, राजकुमार लिल्हारे,राजेश दमाहे, प्रकाश पटले,रमेश कोहरे,महेश गराडे,व गटाचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.