34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता सावलीत १ लाख ४0 हजाराचा दारुसाठा जप्त

सावलीत १ लाख ४0 हजाराचा दारुसाठा जप्त

0
19

सावली,दि.16ः-येथील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वेगवेगळय़ा ३ ठिकाणी अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करुन गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये महेंद्र थोरात यांच्या घरी अवैध दारुचा साठा असल्याच्या माहितीवरुन झडती घेण्यात आली असता ३९४ विदेशी दारुसाठा किंमत १ लाख १८ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. यामधील आरोपी फरार आहे.
तसचे सावली परिसरात दुसर्‍या ठिकाणी घर झडतीत घरामध्ये प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये विदेशी दारुच्या ५0 व ६६ निपा असा एकूण २१ हजार ५00 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. यावेळी आरोपी स्वप्ील कांतीलाल गेडाम रा. सावली याला अटक करण्यात आली आहे. तसेच मौजा व्याहाड बुज येथे चिकन सेंटरमागे दारुविक्री होत असल्याचे माहितीवरुन सापळा रचून धाड टाकली असता ६ निपा किंमत ६00 रुपये जप्त करण्यात आले. तसेच आरोपी रेमाजी ईश्‍वर पेंदोरकर रा. व्याहाड बुज. याला अटक करण्यात आली आहे.
अशा वेगवेगळय़ा कारवाईत १ लाख ४0 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्य़ांचा तपास सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पेालिस उपनिरिक्षक जावेद शेख यांच्या नेतृत्वात पेटकुले, कुमरे, सिडाम, दाते, आतिश, सुमित, अविनाश, राजु केवठ, विजय मडावी, रोहिनी, शुभांगी यांनी केले आहे.

blank