शिक्षकांच्या मागण्यांवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सचिवस्तरीय बैठक

0
11

गोंदिया,दि.16ः- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाच्या निवेदनाची दखल घेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा अनुषंगाने नागपूर येथे सचिवस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, सडक अर्जुनी येथील जीपीएफ अपहार रक्कम तत्काळ शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचे वित्त विभागाचे अव्वर सचिव यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निर्देश दिले. बैठकीत वित्त विभागाचे अव्वर सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, कक्ष अधिकारी (शिक्षण विभाग) मुख्य लेखा वित्त अधिकारी व शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.
२ जानेवारी २00६ ला नियुक्त झालेल्या सर्वच कर्मचार्‍यांना वेतनवाढ लागू करण्याचे वित्त विभागाचे अव्वर सचिव यांनी दिले. निर्देश निवेदनाची दखल घेऊन चटोपाध्याय यादीला सीईओ यांनी मंजुरी, पदानवत मुख्याध्यापक यांच्या रिक्तजागी समायोजन होणार आहे.
अव्वर सचिव यांनी शासन निर्णयानुसार १५00 रुपये नक्षलभत्ता पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे व तसेच अतिरिक्त घरभाडे भत्ता तत्काळ लागू करून थकबाकी अदा करणे यासंदर्भात इतर जिल्हाप्रमाणे कार्यवाही करण्यास सांगितले. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना यासंदर्भात मार्गदर्शन मागितले असल्याने मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच लागू करणार असे सांगितले. संबंधित विषय ग्रामविकास विभागाशी संबंधित असल्याने व लक्ष्यवेधी असल्याने उपसचिव उपस्थित राहू न शकल्यामुळे सदर प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही. मात्र, मंत्री महोदयांनी संबंधित विभागाच्या प्रमुखाना यासंदर्भात सूचना दिल्या व प्रश्न निकाली काढण्याचे कळविले. समितीच्या पदाधिकार्‍यांना सदर प्रश्न सोडविण्यासंदर्भात समोरच्या आठवड्यात तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले.उर्वरित मागण्यांवर लवकरच तोडगा
विशेष सभा आयोजित करून बरेच प्रश्न निकाली काढल्याबद्दल ना. बडोले यांचे समितीच्या पदाधिकार्‍यांनी आभार मानले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यु. खोब्रागडे, उपाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर डोंगरवार, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, सुरेश कश्यप, विनोद बडोले, पी.एन.बडोले, विरेंद्र वालुदे, राजू बोपचे, विलाश डोंगरे, गजानन पाटणकर, विनोद बहेकार, गिरीश काहालकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.