33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Featured News युवा भोयर पवार मंचचे वार्षिक महोत्सव १२ ऑगस्ट रोजी

युवा भोयर पवार मंचचे वार्षिक महोत्सव १२ ऑगस्ट रोजी

0
25
नागपूर,दि.२५ : युवा भोयर पवार मंचचे वार्षिक महोत्सव १२ ऑगस्ट रोजी पवार विद्यार्थी भवन कुकडे ले-आऊट नागपूर य थे दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन‘.डी.राऊत तर मुख्य अतिथी म्हणून शिक्षण विभागाचे सभापती दिलीप दिवे राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून क्षत्रिय पवार समाज संगठनेचे राजू पवार अनुराग, पवार समाज संगठनेचे महासचिव पृथ्वीराज रहांगडाले, भोयर पवार विद्यार्थी मंडळाचे सचिव बंडू पराडकर, पश्चिम नागपूर पोवार समाज संगठनेचे अध्यक्ष एस.एम.पारधी, क्षत्रिय पवार समाज संगठनेचे प्रचार सचिव तुलाराम देशमुख,वैज्ञानिक डॉ. किरण  फुन्ने तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा.संजय नाथे, डॉ. साक्षी बंसल, अजङ्म खवशे उपस्थित राहणार आहेत.सत्कारमुर्ती म्हणून डॉ. विलास फरकाटे, जगन गावरे, जियालाल शरणागत, रामलाल देशमुख, श्रीहरी चौधरी, नामदेवराव बोबडे, डॉ. उदय चौधरी, इंजि. भागवत बुवाडे, डॉ. गणेश ढोले, साहेबराव बोवाडे, अरुण बन्नगरे, हरिश्चंद्र देशमुख, प्रा.चंद्रशेखर टोपले, जगदीश पवार, सुनील ढोले आदिंचा सत्कार करण्यात येणार आहे.