41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय “गरिबीला नाही तर, गरिबांनाच संपवणारा अर्थसंकल्प”

“गरिबीला नाही तर, गरिबांनाच संपवणारा अर्थसंकल्प”

0
21

blank

वी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत शनिवारी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील गरिबीला नाही तर, गरिबांनाच संपवणारा असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. जेटली यांनी आयकरात कोणतीही सूट न देता सामन्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपती धार्जिणा असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे जेटलींचा अर्थसंकल्प सामन्यांसाठी नसून कॉर्पोरेट आणि श्रीमंतांसाठी दिलासा देणारा असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. सदर बजेटबाबत राजकारणी वर्गातून संमिश्र प्रतिक्रीया येताना दिसत आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात समिती, आयोग आणि फक्त आश्वासने याशिवाय दुसरे काहीच भरीव नसल्याची टीका काँग्रेसचे माजी मंत्री कमलनाथ यांनी केली.
यंदाच्या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘कही खुशी, कही गम’ असे करता येईल, असल्याची सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली.
कॉर्पोरेट बजेट, गरीब आणि शेतकरी वर्गासाठी काहीच नाही -अशोक चव्हाणांनी टीका
अर्थसंकल्प हा गुंतवणुकीला चालना देणारा असून कर आकारणीबद्दल असलेले संभ्रमही अर्थसंकल्पातून दूर झालेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
बजेट सर्वसामान्यांसाठी समाधानी असल्याची शिवसेनेची प्रतिक्रिया.

blank