28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ आमगाव रेल्वेस्थानकावर स्वच्छता अभियान

आमगाव रेल्वेस्थानकावर स्वच्छता अभियान

0
32

आमगाव,दि.26 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे डिव्हीजन नागपुर अंतर्गत राबविण्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुरूप आमगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. या अभियानात नागपूर मंडळ विद्युत विभागाचे वरिष्ठ मंडळ रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती नागपूर विभागाचे सदस्य नटवरलाल गांधी, आमगाव रेल्वे सल्लागार समिती सदस्य जगदिश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष घनश्याम अग्रवाल, प्रा.श्रीमती राणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता अभियानाची शपथ घेऊन करण्यात आली. दरम्यान रेल्वे प्लॅटफार्म परिसरात स्वच्छता करण्यात आली. यात स्थानिक भवभूती महाविद्यालयाच्या विद्यार्थी व स्काऊट गाईचे विनोद उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनात स्काऊट गाईड सहभागी झाले होते. दरम्यान, रेल्वे कर्मचारी, विद्यार्थी व स्काऊट गाईडचे सदस्य यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती केली. यावेळी आमगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधक पी.बिश्‍वास, विद्युत विभागाचे बी.के.घोष, पी.मडावी, आर.जी.तागडे, अजय पराते, मल्लीकार्जुन, मेर्शाम आदि उपस्थित होते.