खामखुरा येथील महाश्रमदान शिबिरात सीईओसह अध्यक्षांची हजेरी

0
19
अर्जुनी मोरगाव,दि.२५ः-स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महाश्रमदान दिनानिमित्त २५ सप्टेंबरला तालुक्यातील ग्रामपंचायत खामखुरा येथे महाश्रमदान अभियान उपक्रम राबविण्यात आले.या अभियानात जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी यांच्यासह पंचायत समितीस्तरावरील सर्वच विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.महाश्रमदानापुर्वी गावात स्वच्छता दिंडी काढण्यात आली.या स्वच्छता qदडीत गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, शालेय विद्यार्थी,महिला मंडळाचे सदस्य,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष/सदस्य,नवयुवक गणेश मंडळाचे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा व महात्मा गांधी तैलचित्राला माल्यार्पण करून करण्यात आले.यावेळी दयानिधी यांनी ग्रामपंचायत परिसरात उपस्थित विद्यार्थी,नागरिकांना स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन केले तसेच स्वच्छतेसंबंधी शपथ दिली.शपथ कार्यक्रमानंतर श्रमदान करुन गाव परिसरातील केरकचरा काढण्यात आला.
या महाश्रमदान कार्यक्रमाला राजेश राठोड (उपमुख्य कार्यकारी, अधिकारी,पाणी व स्वच्छता),सुधीर वाळके (उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य),शाम निमगडे(जिल्हा आरोग्य अधिकारी),मिलिंद रामटेके(समाजकल्याण अधिकारी),नरेश भांडारकर(उपमुख्य कार्यकारी,नरेगा),विश्वकर्मा (कार्यकारी अभियंता,ल.पा.) अनंत मडावी (मुख्य ले. व वित्त अधिकारी),राजेश वासनिक(पशु संवर्धन अधिकारी)तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राजेश उखळकर,सुर्यकांत रहमतकर,अतुल गजभिये,विशाल मेश्राम,बालकिशोर पटले, शोभा फटिंग,दिशा मेश्राम,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणप्रसाद, जमईवार,सहाय्यक गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राऊत,बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे,जिल्हा परिषद सदस्य मंदाताई कुंभरे,पंचायत समिती सदस्य आशाताई झिलपे यांच्यासह विस्तार अधिकारी,खामखुरा ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक,शिक्षक,आंगणवाडी सेविका,स्वछाग्रही,आशासेविक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका उपस्थित होते.महाश्रमदान कार्यक्रमात नवयुवक गणेश मंडळ,शालेय विद्यार्थी,गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी श्रमदान करून ‘स्वच्छता हि सेवा‘ अंतर्गत ‘महाश्रमदान‘ उपक्रम राबविले.