37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Featured News अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप, म्हणाली ‘नाना पाटेकरांनी केले गैरवर्तन’

अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप, म्हणाली ‘नाना पाटेकरांनी केले गैरवर्तन’

0
45

blank

तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान, या चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या काही घटना सांगितल्या. सोबतच त्या कशाप्रकारे लपविण्यात आल्या, याबद्दलही मत व्यक्त केले. नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत केलेल्या असभ्य वागणुकीबद्दल अनेक जणांना माहित होते. मात्र, सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली, त्याबद्दल कोणीच बोलले नाही, असेही तिने सांगितले. नानांच्या असभ्य वागणुकीबद्दल बॉलिवूडमध्ये दुर्लक्ष करण्यात आले.
 या मोहिमेबद्दल बोलताना ती म्हणाली, की या अभिनेत्याच्या गैरवर्तनाबद्दल बोलले गेले नाही, तर ही मोहिम कधीच यशस्वी होणार नाही आणि त्याचा देशावर कोणताच परिणाम होणार नाही. अक्षय कुमार आणि रजनीकांत यांसारख्या अभिनेत्यांनी अशा लोकांसोबत काम करण्यास बहिष्कार टाकायला पाहिजे, असेही ती म्हणाली. नानांच्या वागणुकीमुळे तिला चित्रपटातील काही सीन वगळावे लागले होते. तिने नानांच्या वागणुकीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्देशकांना सांगितले होते. मात्र, त्यांनी तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही आणि नानांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले, असा आरोपही तिने लावला.

blank