26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Top News तारिक अन्वरचा राष्ट्रवादीला रामराम,पवारांच्या मोदी समर्थनाचा विरोध

तारिक अन्वरचा राष्ट्रवादीला रामराम,पवारांच्या मोदी समर्थनाचा विरोध

0
22

नवी दिल्ली,दि.28(वृत्तसंस्था)- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव खासदार तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, लोकसभेतल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली होती. तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचे ते म्हणाले होते. पवारांच्या या विधानावर नाराज होत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तारिक अन्वर हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य होते.