24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी निलंबित

जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी निलंबित

0
41

भंडारा,दि.29ः जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांना आरोग्य विभागाने निलंबित केले. त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी धडकले. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते.डॉ. भंडारी हे मागील आठ महिन्यांपासून जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर आहेत. त्यांचे समान पदावर अकोला येथे बदली करण्यात आली होती. परंतु, ते बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नाहीत. अखेरीस शिस्तभंग केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.