गोवर-रुबेला लसीकरणावर आमगावात कार्यशाळा

0
8

आमगाव,दि.29(पराग कटरे)ः- आमगाव तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख यांची  गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २०१९ संदर्भात कार्यशाळा शुक्रवार(दि.28) तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सी.डब्लू.वंजारे यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली.मार्गदर्शक म्हणून  WHO समन्वयक  डाँ.एफ.ए.मेश्राम,आमगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी रामटेके उपस्थित होते. तालुक्यातील 8 केंद्रप्रमुख व 142 मुख्याध्यापक या कार्यशाळेला उपस्थित होते.