23.4 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ जागतिक हृदय दिन कार्यक्रम साजरा

जागतिक हृदय दिन कार्यक्रम साजरा

0
53

गोंदिया,दि.२ : केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत यांनी केले. यावेळी डॉ.राऊत यांनी सांगितले की, स्वस्थ हृदय ठेवणे सर्वस्वी आपल्या हाती आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावयाची आहे. त्यामुळे नियमीत व्यायाम करा, तसेच अतिरिक्त मीठ, लोणचं, पापड इत्यादी खाणे टाळा. मद्य सेवन, तंबाखु व्यसन टाळा व दर महिन्याला स्वास्थाची तपासणी करा असा सल्ला दिला. कार्यक्रमास डॉ.शैलेश कुकडे, डॉ.दिपाक्षी कोल्हटकर, डॉ.स्नेहा वंजारी, डॉ.कविता मदन, सामाजिक कार्यकत्र्या संध्या शंभरकर यांचेसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.