39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय आशिष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा

आशिष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा

0
28

blank

नागपूर,दि.02ः- काटोल मतदारसंघाचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी वर्ध्याला होणाऱ्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला आशिष देशमुख हजेरी लावणार आहेत. विदर्भातील नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुखही आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज होते. देशमुख हे वेगळ्या विदर्भासाठी सातत्याने आग्रही होती. त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. मात्र त्याला थंडा प्रतिसाद दिल्याने ते भडकले होते. ‘प्रत्येक चित्रपटाचा क्लायमॅक्स वेगळा असतो. माझ्या जवळ सर्व पर्याय खुले आहेत. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. या इशाऱ्याकडे भाजपने ढुंकुनही न बघितल्याने देशमुख अधिकच संतापले होते.

blank