25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ मनसेने घेतली मृत गीताच्या कुटुबियांची सांत्वना भेट

मनसेने घेतली मृत गीताच्या कुटुबियांची सांत्वना भेट

0
25
 सालेकसा,दि.04(पराग कटरे)ः- सालेकसा तालुक्यातील सोनपुरी गावात २९ सप्टेंबर रोजी गीता महारु पंधरे या गर्भवती महिलेचा व पोटातील बाळाचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने पंधरे कुटुबिंयावर शोककळा पसरली आहे.मृत गीताला एक अडीच वर्षाची मुलगी असून ती सुध्दा शारीरिकदृष्टया कमकुवत आहे.या सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी मृत महिलेच्या परिवाराला भेट देऊन सांत्वन केले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामूळे गीताचा मृत्यू झाल्याची तक्रार असून संबंधित डॉक्टरांवर कार्यवाही करून निलंबित करण्याची मागणी मृताच्या परिवाराने बैस यांच्याकडे केली.बैस यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा तर्फे जी काही शासकीय मदत लागेल ती सर्व उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न राहतील असे आश्वासन दिले.यावेळी तालुका उपाध्यक्ष ध्रुव हुकरे, शहर अध्यक्ष राहुल हटवार, विद्यार्थी सेनेचे स्वप्नील करवाडे उपस्थित होते.