25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Top News नक्षल्यांनी केली युवतीची हत्या?

नक्षल्यांनी केली युवतीची हत्या?

0
19

गडचिरोली, दि.७: भामरागड तालुक्यातील इरपनार येथील एका युवतीची नक्षल्यांनी हत्या केल्याने खळबळ माजली आहे. बेबी मडावी(२२)असे मृत युवतीचे नाव आहे.काल(दि.६)सकाळी बेबीचा मृतदेह परायणार क्रॉसिंगजवळ आढळून आला. बेबी मडावी ही चार दिवसांपूर्वी ती घरुन निघून गेली होती. ५ ऑक्टोबरच्या रात्री तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली. घटनास्थळी नक्षली पत्रक आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. बेबी मडावी ही पोलिस भरतीत सहभागी झाली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. मात्र, बेबीची हत्या नक्षल्यांनीच केली कि अन्य कुणी, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. धोडराज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

blank