26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ विज तारेच्या स्पर्शाने मुलगा जखमी

विज तारेच्या स्पर्शाने मुलगा जखमी

0
32

तुमसर,दि.10ः- शहरातील माकडे नगर येथील रहिवासी मोरेश्वर खरवडे यांच्या मुलगा जतीन मोरेश्वर खरवडे (वय 14) याचा विज तारेशी संपर्क आल्याने 80 टक्के भाजला गेल्याची घटना आज बुधवारला सकाळी घडली.जतीनला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात त्वरीत उपचारासाठी हलविण्यात आले आहे.सविस्तर असे की आज सकाळी शारदा देवीची स्थापना करण्याकरिता तयारी करीत असताना जतीन हा लोखंडी पाइप आणावयास गेला असता त्या पाईपचा जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने धक्का बसला आणि त्यात तो भाजला गेला.त्याची प्रकृती ही चिंताजनक असून कुटुबिंयाना धक्का बसला आहे.