25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राष्ट्रीय देश तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा एकतर्फी विजय

तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा एकतर्फी विजय

0
36

हैदराबाद(वृत्तसंस्था),दि.11: तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रसमिती (TRS) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. विधानसभेच्या 119 जागापैकी टीआरएसने तब्बल 87 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 19 तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगूदेसम पक्षाला केवळ 2 जागा जिंकता आल्या. ओवैसी यांच्या एमआयएमला 7 जागा मिळाल्या तर भाजपला फक्त 1 जागेवर समाधान मानाले लागले. 2 अपक्ष निवडून आले.

तेलंगणा राष्ट्र समितीला तब्बल 47 टक्के मते मिळाली तर काँग्रेस पक्षाला 28.7 टक्के मिळाली. भाजपला 7 टक्के तर तेलगू देसम पक्षाला 3.1 टक्के मते मिळाली. एमआयएम पक्षाला 2.7 टक्के मते मिळाली. बसपाला 1.9 टक्के मिळाली पण एकही जागा जिंकता आलेली नाही

blank