34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार

दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार

0
26

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भूसंपादन विधेयकाला विरोध करत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर आज (सोमवार) दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी विरोध करण्यात आला आहे. काँग्रेसने आज या विधेयकाविरोधात रॅलीचे आयोजन केले होते. जयराम रमेश, राज बब्बर, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट आणि युवक काँग्रेसचे अमरिंदरसिंह ब्रार यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली संसदेकडे जात असताना पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले व लाठीमार करण्यात आला.

या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘किसान विरोधी नरेंद्र मोदी‘ अशा घोषणा दिल्या. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले असून, राज्यसभेत ते मंगळवारी सादर करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यसभेत सत्ताधारी भाजपचे पक्षीय बलाबल कमी असल्याने विधेयकाला विरोध होण्याची शक्यता आहे.

blank