महाराष्ट्रात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक

0
16

नवी दिल्ली – महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या काही वर्षात बलात्कार तसेच महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून २०१४ मध्ये महिला अत्यांचारांच्या सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती गांधी यांनी लोकसभेत लेखी उत्तरादरम्यान दिली. राज्यात गेल्यावर्षी सुमारे १३ हजार ८२७ तक्रारींची नोंद झाली. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये १३ हजार ३२३ आणि आंध्र प्रदेश १३ हजार २६७ तक्रारी दाखल झाल्या.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, महिलांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मनेका गांधींनी सांगितले.