33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News बक्षिस असलेले सुधाकरन आणि पत्नी नीलिमाचे आत्मसमर्पन

बक्षिस असलेले सुधाकरन आणि पत्नी नीलिमाचे आत्मसमर्पन

0
29

blank

गडचिरोली,दि.11: महाराष्ट्र व तेलगांणा पोलीसांनी बक्षीस जाहिर केलेल्या यादीतील सुधाकरन व त्याची पत्नी निलिमाने तेलंगाणा पोलीसासमोर आज आत्मसमर्पण केले आहे.सुधाकरणवर 1 कोटी आणि त्यांची पत्नी नीलिमा हिच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षिस होते.अजूनही तेलंगाना पोलीसांनी औपचारिक घोषणा केलेली नाही.परंतु झारखंड पोलीसांच्या सूत्रांनुसार नक्षलवाद्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी  काही दिवसापूर्वी तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सुधाकरन, माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य असून तो ओगु, सतवाजी, बुरायार, सुधाकर आणि किरण या इतर नावांनी ओळखला जात होता. झारखंडमध्ये, या नक्षलवाद्यांनी तेंदूपत्ता ठेकेदारांकडून आणि कंत्राटदाराकडून खंडणीगोळा करून मोठी मालमत्ता जमविली आहे आणि आपला मित्र सत्यनारायणच्या माध्यमातून त्याने या पैशांना व्यवसायात गुंतवून ठेवल्याचे बोलले जात आहे. नक्षलवादी नेता अरविंद याच्या मृत्यूनंतर झारखंड आणि छत्तीसगढ येथील नक्षलवादी संघटना या सुधाकरणच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती.

blank