39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ उपसभापतींनी लगावली बीडीओंच्या कानशिलात

उपसभापतींनी लगावली बीडीओंच्या कानशिलात

0
24

मलकापूर : क्षुल्लक कारणावरुन मलकापूर पंचायत समितीच्या आमसभेत उपसभापतींनी ुबीडीओंना मारहाण केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली. दरम्यान, आमसभेचे अध्यक्ष आ. चैनुसख संचेती यांच्या मध्यस्थीने वाद मिटल्याचे सांगितले जाते.
आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती विद्या नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमसभा सुरु झाली. यावेळी क्षुल्लक कारणावरुन गटविकास अधिकारी आर. बी. गुजर व उपसभापती दादाराव तायडे यांच्यात वाद उफाळून आला. यावेळी उपसभापतींनी गुजर यांची कॉलर पकडून खिसा फाडला व त्यांच्या कानशिलात लगावून दिली. अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थित पदाधिकारी अवाक झाले. शेवटी आमदार संचेती यांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद शमला.

blank