25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात

जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन उत्साहात

0
39

भंडारा,दि.01 मार्चः- भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ भंडारा व सार्वजनिक वाचनालय भंडाराच्या सहकार्याने २२ वे जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले.या अधिवेशनाचे उदघाटन वर्ध्याचे गजानन कोटेवार यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी  मंजुषा ठवकर, कर्मचारी संघटनेचे नेते विजय शिंदे,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल उपस्थित होते.या कार्यक्रमाला भंडारा, तुमसर, मोहाडी,लाखनी,साकोली,लाखांदुर, पवनी या सर्व तालुकातील सर्व पदाधिकारी, सेवक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलान सहकार्यवाह प्रदिप गादेवार यांनी केले.तर आभार घनश्याम कानतोडे यांनी मानले.