24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ,मुख्यमंत्रीसह आ.फुकेंचे मानले आभार

पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ,मुख्यमंत्रीसह आ.फुकेंचे मानले आभार

0
79

गोंदिया,दि.01 मार्चः- दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती पाळणारे म्हणून ख्याती असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या माध्यमातून पोलीस पाटिल संघटना व मुख्यमंत्री यांच्यासोबत विधानभवनात झालेल्या बैठकीमधे आचारसहिंतेपुर्वी मानधन वाढविण्याचे आश्वाशन दिले होते. त्यानुषंगाने पोलीस पाटलांच्या मानधनामधे 3 हजार रुपयावरुन 6 हजार रु मानधन वाढ करण्याचा निर्णय  आज(दि.01) घेण्यात आला.त्यातच 500 रुपये सोशल वेलफेयर निधी मध्ये जमा करुन  पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना 5 लाखाचा विमा काढण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. उपरोक्त मागण्या संदर्भात पुढाकार घेऊन मानधन वाढ करण्यात महत्वाची भुमिका पार पाडल्याबद्दल आमदार मा.डाँ. परिणय फुके यांचे तसेच मुख्यमंत्र्याचे  पोलीस पाटील संघटना,महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत .