23.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ एकोडी ग्रामपंचायतीचे 3 सदस्य अपात्र

एकोडी ग्रामपंचायतीचे 3 सदस्य अपात्र

0
36

गोंदिया,दि.02ः- तालुक्यातील एकोडी ग्रामपंचायतीचे 3 सदस्यांचे वेेळेच्या आत जातप्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द करण्याच्या अपर जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे.ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10,1अ अन्वये जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर न केल्याच्या तक्रारीवर अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे 19 डिसेंबर 2016 रोजी पदमुक्त केले होते.त्यामध्ये मायाबाई मयाराम तायवडे,गीताबाई प्रकाश भेलावी,चित्रकला तेजराम वघारे यांचा समावेश आहे.यांनी या निर्णयाविरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.त्यानुसार नागपूर खंड़पीठाने 29 जानेवारी 2017 चा निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या 23 आगस्ट 2018 च्या निर्णय़ कायम ठेवत 4 डिसेंबर 2018 रोजी तीन्ही सदस्यांना अपात्र केले आहे.