38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News इंदापूरात काँग्रेस नगरसेवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

इंदापूरात काँग्रेस नगरसेवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

0
16

blank

इंदापूर (पुणे)- इंदापूर शहर नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांची अज्ञात ठोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करीत मंगळवारी रात्री हत्या केली. मंगळवारी रात्री शहरातील बाबा चौकात धनंजय यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर धनजंय यांना अकलूज येथील रूग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
इंदापूर शहरातील नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष धनंजय वाशिंबेकर हे बाबा चौकात आले होते. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोर ठोळक्याने काही कळायच्या आताच हल्ला करून तेथून पसार झाला. विशेष म्हणजे बाबा चौक शहरातील प्रमुख चौक आहे व तेथे लागूनच पोलिस चौकी आहे तरीही वाशिंबेकर यांच्यावर हल्ला झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.

blank